
मंदिरांना २५ कोटी रु. उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.श्री.देवेंद्र फडवणीस साहेब यांचे आभार मानण्यासाठी उपदेशी समाज बांधवांच्या वतीने श्रीकृष्ण मंदिर, शिवसृष्टी नगर, धाराशिव येथे कार्यक्रम संपन्न झाला.
मराठीतील पहिला ग्रंथ रुध्दपुर, ता.मोर्शी, जि.अमरावती येथे लिहिला गेला असल्याने मराठी विद्यापीठ रुद्धपुर येथेच स्थापन करावे अशी भारत देशातील व महाराष्ट्र राज्यातील सर्व महानुभव पंथातील संत, महंत, आचार्य व उपदेशी बांधवांची अनेक वर्षांची मागणी होती. सदरील मागणी पूर्ण झाली आहे.
तसेच पोहीचा देव पंचाळेश्वर, जि.बीड व गोरक्षण मंदिर नांदेड, जाळीचा देव, जालना, काटोल, काटसुर, रुध्दपुर व इतर मंदिरांना २५ कोटी रु. उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.श्री.देवेंद्र फडवणीस साहेब यांचे आभार मानण्यासाठी उपदेशी समाज बांधवांच्या वतीने श्रीकृष्ण मंदिर, शिवसृष्टी नगर, धाराशिव येथे कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी श्री.अजिंक्य राजेनिंबाळकर, श्री.किरण पाटील व इतर महानुभाव पंथीय उपदेशी बांधव उपस्थित होते.
#महानुभव #मराठी #विद्यापीठ #धाराशिव #mahanubhavpanth #marathi #university