
‘मन की बात’ हा पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचा कार्यक्रम वडगांव (सिद्धेश्वर), ता.धाराशिव येथे बुथ कमिटी सदस्य, शक्ती केंद्र प्रमुख, कार्यकर्ते व ग्रामस्थांसमवेत पाहिला.
‘मन की बात’ हा पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचा कार्यक्रम वडगांव (सिद्धेश्वर), ता.धाराशिव येथे बुथ कमिटी सदस्य, शक्ती केंद्र प्रमुख, कार्यकर्ते व ग्रामस्थांसमवेत पाहिला.
आज ‘मन की बात’ च्या ९९ व्या भागात पंतप्रधान महोदय यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक विकास, एक भारत-श्रेष्ठ भारत, अवयव दान, महिला सक्षमीकरण, महिलांचा विकास, काश्मीर मध्ये होत असलेले सकारात्मक बदल, काशी आणि तमिळ क्षेत्रातील साजरा करण्यात आलेला ऐतिहासिक, सांस्कृतिक उत्सव अशा विविध विषयांवर विस्तृत संवाद साधला.
पुणे येथील एका सोसायटीचे उदाहरण देऊन त्यांनी सौर उर्जेवर देखील भाष्य केले. भारतात सौर ऊर्जेचे प्रमाण वाढत असल्यामुळे जगभरातून कौतुक केले जात आहे.
मा.नरेंद्रजी मोदी यांच्या भाषणाला प्रभावित होऊन न.प.धाराशिवचे मा.गट नेते श्री.युवराज नळे यांनी अवयवदानचा संकल्प केला.
येणारा ‘मन की बात’ चा कार्यक्रम हा १०० वा असणार आहे. या निमित्ताने सदरील कार्यक्रमाबाबत देशवासीयांच्या मनात काय भावना आहे हे जाणून घ्यायची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
मा.मोदी साहेब देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी होत आहे. नुकतेच इस्रोच्या 36 LVM3-M3 वन वेब सॅटेलाइटने अंतराळात यशस्वीपणे झेप घेतली आहे. याबद्दल इस्रोच्या सर्व भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन !
#मन_की_बात #मोदीजी #इस्रो #धाराशिव #ManKiBaat #Modiji #Oneweb
#LVM3Rocket #Satellites #India #Sriharikota