skip to Main Content
कोंड, ता.जि.धाराशिव येथे भेट देऊन ‘महाबजेट आपल्यासाठी’ अंतर्गत ग्रामस्थांशी अर्थसंकल्पाबाबत संवाद साधला.

कोंड, ता.जि.धाराशिव येथे भेट देऊन ‘महाबजेट आपल्यासाठी’ अंतर्गत ग्रामस्थांशी अर्थसंकल्पाबाबत संवाद साधला.

#LatePost | कोंड, ता.जि.धाराशिव येथे भेट देऊन ‘महाबजेट आपल्यासाठी’ अंतर्गत ग्रामस्थांशी अर्थसंकल्पाबाबत संवाद साधला.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अभूतपूर्व असा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला असून समाजातील प्रत्येक घटकाला सर्वार्थाने न्याय दिला आहे. त्यांनी अर्थसंकल्पात केवळ घोषणाच केल्या नसून त्यावर कृती करण्यास देखील सुरुवात केली आहे.
अर्थसंकल्पातील प्रत्येक बाबींवर काम करण्यात येणार असून फेब्रुवारी २०२४ मध्ये केलेल्या कामांचा कृती आराखडा ते जनतेसमोर मांडणार आहेत. त्यामुळे याबाबतची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते व कार्यकर्ते जाऊन या महाबजेटची माहिती देणार असून ‘महाबजेट आपल्यासाठी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या घरात पैसे आल्यानंतरच ग्रामीण अर्थव्यवस्था चालते. शेतकरीच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चक्र व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो. मात्र त्यांना निसर्गावरती अवलंबून राहावे लागते. श्री.देवेंद्रजी यांनी शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा व केंद्र सरकार प्रमाणे ६,००० रुपये सन्मान निधीची घोषणा केली आहे. तसेच विविध समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विकास महामंडळांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत वैद्यकीय खर्चाची मर्यादा १.५ लाखहून ५ लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे.
पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योजकांना कर्जावर ३५% अनुदान दिले जाते. यावर्षी जिल्ह्यातील ६५० पेक्षा जास्त उद्योग, व्यवसाय या माध्यमातून सुरू झाले आहेत. अशा योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.
शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. स्मार्ट योजनेच्या माध्यमातून जवळपास २ कोटी अनुदान असणारे प्रकल्प जिल्ह्यात सुरू करण्यात येत आहेत. या योजनेतून वेअर हाऊस, कोल्ड स्टोरेज, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करता येतात. आपल्या एका जिल्ह्यात ३२ प्रकल्प मंजूर करण्याचे उद्दिष्ट्य केंद्र व राज्य सरकारने दिले आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक उद्योग सुरू झालेले दिसतील.
शिंदे-फडणवीस सरकार देणारे सरकार असून केवळ शेतकरीच नाही तर निराधार, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांच्या मानधनामध्ये वाढ केली. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प, रेल्वे प्रकल्पासाठी, मेडिकल कॉलेजसाठी निधी दिला. हे बजेट सर्वसामान्यांचे सर्वसमावेशक बजेट असून शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा घेऊन जाणार असल्याचे मत यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.नितिन काळे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद सदस्या उषाताई येरकळ यांनी गावात झालेली व सुरु असलेल्या विकास कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.रामेश्वर शेटे यांनी केले.
याप्रसंगी माजी उपसरपंच श्री.रामेश्वर शेटे, माजी सरपंच श्री.सिद्धेश्वर शेटे, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगुडे, तालुकाध्यक्षा उषाताई येरकळ (सर्जे), भाजपा गट प्रमुख श्री.बाळासाहेब खांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.चंद्रकांत गुरव, ग्रामपंचायत सदस्य श्री.राहुल जाधव, श्री.किशोर सर्जे, नितळीचे उपसरपंच श्री.सदाशिव साखरे, श्री.संगमेश्वर स्वामी, श्री.नीलकंठ पाटील, श्री.दादा क्षीरसागर, श्री.बाळू गिरी, श्री.इर्शाद मुलाणी, पत्रकार श्री.हुकूमत मुलाणी, श्री.विष्णू लोंढे, प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
#अर्थसंकल्प #विकास #धाराशिव #Budget2023 #devlopment #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.