
लोकमंगल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या सामाजिक उपक्रमात उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या
लोकमंगल फाऊंडेशनचे प्रणेते, माजी सहकार मंत्री तथा आमदार श्री.सुभाषजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव येथील छायादीप मंगल कार्यालयात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. लोकमंगल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या सामाजिक उपक्रमात उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या..
या विवाह सोहळ्यात ११ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. लोकमंगल फाऊंडेशनचे धाराशिव शहरातील सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे १८ वे वर्ष आहे. दरवर्षीच्या अशा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, युवानेते श्री.रोहन देशमुख व त्यांच्या सर्व टीमचे कौतुक केले.
#सामूहिक #विवाह #समारंभ #wedding #Dharashiv