
उमरगा (चिवरी) ता.तुळजापूर येथील ठाकरे गटाचे सरपंच, सदस्य, पॅनलप्रमुख, शाखाप्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश !
उमरगा (चिवरी) ता.तुळजापूर येथील ठाकरे गटाचे सरपंच, सदस्य, पॅनलप्रमुख, शाखाप्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश !
देश व राज्यातील भारतीय जनता पार्टीचे खंबीर नेतृत्व, विकासाचा मुद्दा व आपल्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या प्रवेशामुळे उमरगा (चिवरी) हे गाव भाजपमय झाले असून गावात विकासाची गंगा आणखी वेगाने प्रवाहित होईल..
सरपंच श्री.सर्वेश्वर पाटील, सदस्य श्री.महादेव वडजे, सौ.रोहिणीताई सावंत, सौ.लक्ष्मीताई चाफे, पॅनलप्रमुख श्री.व्यंकटराव सावंत व श्री.अल्लाउद्दीन इनामदार यांच्यासह माजी सदस्य श्री.शाहूराज कदम, श्री.सुभाष घोडके, ठाकरे गटाचे शाखा प्रमुख श्री.भीमराव जाधव, शाखा अध्यक्ष श्री.नागनाथ वडजे, सदस्य श्री.मौला इनामदार, श्री.तानाजी सावंत, श्री.गणेश सावंत, श्री.अविनाश कदम, श्री.राम कदम, श्री.दीपक परीट, श्री.स्वप्नील शितोळे, श्री.स्वप्नील वडजे, श्री.वैभव वडजे, श्री.महालाप्पा चाफे, श्री.शंकर चाफे, श्री.सोमनाथ वडजे, श्री.अण्णा वडजे या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे भाजपात स्वागत करून शुभेच्छा दिल्या..
आपण माझ्यावर विश्वास दाखवून भाजपा कुटुंबात प्रवेश केला आहे, तो विश्वास सार्थकी लावण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. चिवरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय योजनांतून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न देखील आपण करणार आहोत.
सदर पक्ष प्रवेशासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅड.दीपक आलुरे तसेच युवा मोर्चा तालुका कार्याध्यक्ष श्री.दयानंद मुडके यांनी परिश्रम घेतले.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, जिल्हा संयोजक श्री.नेताजी पाटील, तालुकाध्यक्ष श्री.संतोष बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.विक्रमसिंह देशमूख, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.आनंद कंदले, श्री.यशवंत लोंढे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#भाजपा #जाहीर #प्रवेश #स्वागत #धाराशिव #BJP #BJP4Maharashtra