skip to Main Content
CMEGP योजने अंतर्गत रोजगार निर्मितीच्या बाबतीत धाराशिव जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल.. शासनाने जिल्ह्यासाठी ठेवलेले उदिष्ट पूर्णत्वाकडे जात आहे

CMEGP योजने अंतर्गत रोजगार निर्मितीच्या बाबतीत धाराशिव जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल.. शासनाने जिल्ह्यासाठी ठेवलेले उदिष्ट पूर्णत्वाकडे जात आहे

धाराशिव जिल्हा महाराष्ट्रात नं.१ | #CMEGP योजने अंतर्गत रोजगार निर्मितीच्या बाबतीत धाराशिव जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल.. शासनाने जिल्ह्यासाठी ठेवलेले उदिष्ट पूर्णत्वाकडे जात आहे..
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून ६४५ पेक्षा अधिक स्वयंरोजगार सुरू होऊन निर्धारित लक्ष्यपूर्तीच्या सापेक्षत्वात धाराशिव जिल्हा सर्वाधिक टक्केवारीसह राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. सदर योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी अजून ताकदीने आपण प्रयत्न करणार आहोत.
“आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर धाराशिव” हे स्वप्न साकार करण्यासाठी व जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात खऱ्या अर्थाने वाढ करण्यासाठी येथील युवकांना छोटे, मोठे उद्योग व शेती पूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष अभियान राबवून २५ ते ३५ % अनुदान असलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून युवकांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
देशातील प्रत्येक नागरिकाने आत्मनिर्भर व्हावे, विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी व्हावे या दृष्टीने पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची सुरुवात झाली..
जिल्ह्यातील युवकांना नवीन उद्योग उभारण्यासाठी अथवा चालू व्यवसायाची व्याप्ती करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदानासह कर्ज स्वरूपात भांडवल उपलब्ध करून दिली जाते. बुथ तेथे उद्योजक या संकल्पनेतून जिल्ह्यात अनेक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून मार्गदर्शन केले जाते.
तसेच गावपातळीवर कार्यकर्त्यांमार्फत थेट संवाद साधून सदरील योजनेचा प्रसार देखील आपण करत आहोत. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे..
दि.०१/०४/२०२२ पासून आतापर्यंत जवळपास ४,००० प्रकरणांना जिल्हा उद्योग केंद्राची मान्यता घेऊन कर्ज मंजुरी साठी बँकांकडे पाठविण्यात आले आहे. या प्रयत्नांमधून ६४५ पेक्षा अधिक उद्योग बँकेकडून मंजूर झाले आहेत. यामध्ये DIC अंतर्गत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेसाठी ८७ उद्योगांना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेसाठी ३५० उद्योगांना मंजुरी मिळाली आहे. तसेच KVIB अंतर्गत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेसाठी ५७ उद्योगांना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेसाठी १५१ उद्योगांना मंजुरी मिळाली आहे.
यासाठी अनेकांना फॉर्म भरण्यापासून ते बँकेत कर्जाची फाईल मंजूर होऊन उद्योग व्यवसाय सुरू होईपर्यंत सर्व प्रकारचे सहाय्य आपण कार्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत..
जिद्दीने, कष्टाने आणि स्वकर्तुत्वाने ‘आत्मनिर्भर’ होऊ पाहणाऱ्या नागरिकांना पाठबळ मिळत असल्याचा आनंद वाटतो… धाराशिव जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक स्वावलंबन प्राप्त करावे हीच आपली प्रमुख भूमिका यामागे आहे..
राज्यभरात जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याने आपली जबाबदारी वाढली आहे. या जबाबदारीला समर्थपणे पेलत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना अधिक कार्यान्वित करण्याचा संकल्प करूया.. मार्च अखेर जिल्ह्याचे उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल असा विश्वास वाटतो.
#रोजगार #योजना #पंतप्रधान #मुख्यमंत्री #धाराशिव #Employment #Scheme #PrimeMinister #CM #dharashiv #आत्मनिर्भर

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.