राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपयांचे अनुदान जाहीर केल्याबद्दल वाडी बामणी, ता.धाराशिव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याची माळ देऊन अभिनंदन केले.
राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपयांचे अनुदान जाहीर केल्याबद्दल वाडी बामणी, ता.धाराशिव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याची माळ देऊन अभिनंदन केले.
अगोदर ३०० रुपयांचे अनुदान शासनाने जाहीर केले होते. मात्र शेतकऱ्यांचे हित जोपासणारे हे सरकार असल्याने शेतकऱ्यांची मागणी विचारात घेत अधिकचे ५० रुपये वाढविण्यात आले आहेत. साहजिकच शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण आहे.
इतर राज्यात विक्री केलेल्या कांद्यालाही अनुदान द्यावे अशी मागणी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
याप्रसंगी सरपंच श्री.काकासाहेब शेळके, श्री.धनु माळी, श्री.अजित चव्हाण, भाजपा नेते श्री.तात्याराव शिंदे, ॲड.बालाजी बिडवे, श्री.सागर करळे, श्री.किरण शिंदे, श्री.अजय मोटे, श्री.राम शिंदे, श्री.ऋषिकेश शिंदे, श्री.तात्याराव माने, श्री.नागनाथ थिटे व इतर शेतकरी उपस्थित होते.
#शेतकरी #कांदा #शेती #धाराशिव #farmer #onion #farming #Dharashiv