skip to Main Content
जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील मुलींना २,००० सायकल वाटप करण्याचा संकल्प..

जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील मुलींना २,००० सायकल वाटप करण्याचा संकल्प..

जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील मुलींना २,००० सायकल वाटप करण्याचा संकल्प..
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. यासाठी महिलांचा देखील उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. राज्य सरकार याबाबत अतिशय सकारात्मक असून महिलांसाठी विशेष योजना राबवित आहे.
अनेक मुलींना गावात माध्यमिक शाळेची सोय नसल्याने शाळेत जाण्यासाठी काही किलोमीटर पायपीट करावी लागते. त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी माध्यमिक शाळेतील मुलींना २,००० सायकल उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन यावेळी केले.
‘आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर धाराशिव’ योजनेअंतर्गत युवक-युवतींना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह चालू व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
अनेक महिलांनी या अंतर्गत प्रस्ताव दाखल केले असून स्वतःचे उद्योग देखील सुरू केले आहेत. उमेद गटातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा व काही अडचणी आल्यास संपर्क साधावा असे आवाहन यावेळी केले. शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांना व्हावी यासाठी माहिती पुस्तिका तयार करण्यात येत आहे.
अनेक गावे, तांडे, वस्तीवर माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनींना शिक्षणासाठी परगावी चालत जावे लागते. त्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी जिल्ह्यातील माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या गरीब कुटुंबातील मुलींना सी.एस.आर च्या माध्यमातून सदरील सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे मुलींचे शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी होण्यास देखील मदत होणार आहे.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, ॲड.कल्पना निपाणीकर, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ.बलवीर मुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे व असंख्य महिलांची उपस्थिती होती.
#सायकल #महिला #विद्यार्थिनी #धाराशिव #bicycle #women #student #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.