
दहिटणा, ता.तुळजापूर येथील सरपंच श्री.परमेश्वर बाबु कांबळे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत तसेच निलेगाव येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
दहिटणा, ता.तुळजापूर येथील सरपंच श्री.परमेश्वर बाबु कांबळे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत तसेच निलेगाव येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
यावेळी सर्वांचे स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.
पक्षाचे खंबीर नेतृत्व, आपली कार्यपद्धती आणि विकासाच्या मुद्यावर आकर्षित होऊन अन्य पक्षातील कार्यकर्ते व स्थानिक लोकप्रतिनिधींचा भाजपात येण्याचा ओघ सुरूच आहे…
यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, बूथ प्रमुख श्री.विट्ठल घंटे, युवक कार्यकर्ते श्री.ओंकार वाघोळे, भाजपा शाखाध्यक्ष श्री.सचिन वाघोळे, शाखा उपाध्यक्ष श्री.नागेश मुळे, सचिव श्री.सागर जमादार, श्री.कलाप्पा मुळे, श्री.गुरुशिदप्पा मुळे, श्री.सतीश मुळे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तुळजापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#पक्ष #पार्टी #प्रवेश #धाराशिव #political_party #dharashiv