
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
स्त्रीला शक्ती स्वरूपात अर्थात पूजनीय देवीच्या स्वरूपात पाहणारा भारत देश महान आहे. त्यातच महाराष्ट्रात तर साडेतीन शक्ती पिठांची संकल्पना सुप्रतिष्ठीत आहे. याच संकल्पनेला देशपातळीवर अधोरेखित करणारा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी सर्वांना महाराष्ट्र सरकारतर्फे दाखविण्यात आला, यातच आपल्या राज्य सरकारची प्राथमिकता दिसून येते.
देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती म्हणून आदिवासी कुटुंबातील महिला जेव्हा विराजमान होते, तेंव्हा भारत सरकारची प्राथमिकता जगाला विशिष्ट संदेश देणारी ठरते.
वसुधैव कुटुंबकम असे भारतीय तत्त्वज्ञान आचरणात आणताना या कुटुंबाचे सृजन करण्यासाठी शक्ती स्वरूप स्त्रीला सर्वोच्च सन्मान मिळणे हीच सर्वांची प्राथमिकता आहे आणि असली पाहिजे.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#महिला #शक्ती_पीठ #तुळजापूर #तुळजाभवानी #womenday #tuljapur #tuljabhavani #Dharashiv