
आपले सरकार असल्यामुळे जनतेचे प्रश्न मार्गी लावू शकलो.
आपले सरकार असल्यामुळे जनतेचे प्रश्न मार्गी लावू शकलो.
जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मागच्या काही दिवसांमध्ये विविध निवडणुकांमुळे जनता दरबार घेणे शक्य झाले नाही. मात्र मागील २ दिवसांपूर्वी तुळजापूर येथे व आज धाराशिव येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करता येत असल्यामुळे या जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात शिंदे-फडणवीस हे आपल्या हक्काचे सरकार असल्यामुळे विशेष लक्ष देऊन जनतेची कामे मार्गी लावता येत आहेत. त्यांच्या अनेक समस्या जनता दरबारामध्ये सोडवू शकलो याचे समाधान वाटते.
केशरी कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून देण्यात येत असलेले राशन बंद झाले होते. मात्र शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने एक नवीन घोषणा केली आहे. त्यामध्ये धान्य ऐवजी प्रत्येक लाभार्थ्याला १५० रुपये मिळणार आहेत.
विशेष म्हणजे सदरील रक्कम कुटुंब प्रमुख असलेल्या महिलेच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्वसामान्यांच्या हिताचे असे अनेक चांगले निर्णय सरकार घेत आहे. रेशन धारकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून प्रत्येक लाभार्थ्याने लवकरात लवकर अर्ज भरून द्यावेत असे आवाहन यावेळी केले.
खरीप २०२२ मधील पिकांच्या नुकसानीपोटी विमा वितरणास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये १७० ते १८० कोटी रुपये जमा होतील. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे पीक विमा कंपनीला कळविले होते, परंतु त्यांचे पंचनामे झालेले नाहीत अशा शेतकऱ्यांना संबधित मंडळात नुकसान भरपाई दिलेल्या इतर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई रकमेची सरासरी काढण्याचे काम सुरू आहे. ती नुकसान भरपाईची रक्कम देखील येणाऱ्या १५ दिवसांमध्ये दिली जाईल.
स्वयंरोजगार निर्मितीमध्ये जिल्हा अव्वल ठरत आहे. जिल्ह्यात स्वयंरोजगार निर्मितीकडे तरुणांचा कल वाढलेला आहे. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत जिल्ह्यातील ५५० पेक्षा अधिक नागरिकांनी लहान, मोठे उद्योग सुरू करून स्वतःसह इतरांना देखील रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्या माध्यमातून त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. स्वयंरोजगार निर्मितीसाठी ग्रामीण भागात ३५% तर शहरी भागात २५% अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील यावेळी केले.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष श्री.दत्ता कुलकर्णी, जिल्हा समन्वयक श्री.नेताजी पाटील, तालुकाध्यक्ष श्री.राजाभाऊ पाटील, तेरणा कारखान्याचे माजी चेअरमन श्री.सुरेश देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती श्री.नानासाहेब कदम, भारतीय जनता युवा मोर्चाचे श्री.राजसिंह राजेनिंबाळकर, धाराशिव तालुकाध्यक्ष श्री.ओम नाईकवाडी, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी व असंख्य नागरिक उपस्थित होते.
#जनता #दरबार #समस्या #धाराशिव #public #problem #help #dharashiv