
बहुला, ता.कळंब येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत बहुला ग्रामविकास पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे.
बहुला, ता.कळंब येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत बहुला ग्रामविकास पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे. त्याबद्दल विजयी उमेदवारांचा व प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये श्री. पोपट कोठावळे, श्री.धनजय ठोंबरे, श्री.शिवराम कोठावळे, श्री.अशोक शेळके, श्री.सोमनाथ शेळके, श्री.बारीकराव भालेराव, श्री.संतोष बीक्कड, श्री.सुधाकर कोठावळे, श्री.नीलकंठ कोठावळे, श्री.रघुनाथ कोठावळे आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते यांचा समावेश होता.
तसेच सदरील निवडणुकीत अविरत परिश्रम घेणारे पॅनल प्रमुख श्री.संदीप अनंत बिकड व प्रमुख कार्यकर्त्यांचा देखील सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, बाजार समितीचे माजी सभापती श्री.रामहरी शिंदे, प्रमूख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#निवडणूक #विजय #भाजपा #धाराशिव #election #victory #BJP4Maharashtra #dharashiv