skip to Main Content
शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.
प्रशासकीय स्तरावरील प्रलंबित कामे जनता दरबाराच्या माध्यमातून मार्गी लागतात. जनता दरबारात समस्या व तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जनता दरबारात सर्व तालुकास्तरीय संबंधित अधिकारी हजर असतात. त्यामुळे काम नेमके कुठे अडकले आहे हे लक्षात येते. सदरील काम लवकर मार्गी लागल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतो.
आजच्या जनता दरबारात महसूल, महावितरण, कृषी, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, निराधार पगारी, घरकुल आदी बाबत नागरिकांनी प्रामुख्याने समस्या मांडल्या. त्या समजून घेऊन तात्काळ सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
#जनता #दरबार #तुळजापूर #धाराशिव #janta #darbar #tuljapur #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.