
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अंतर्गत ३,९०,००० रुपयांचे कर्ज मंजूर
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अंतर्गत ३,९०,००० रुपयांचे कर्ज मंजूर.. प्रयोगशील व्यवसायिक श्री.रमेश झेंडे यांच्या नव्या व्यवसायाला सुरुवात..
शिंगोली, धाराशिव येथील श्री.रमेश यांना सदरील मशीन खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्याची गरज होती. आपण आयोजित केलेल्या शिबिराच्या माध्यमातून त्यांना #PMEGP योजनेची माहिती मिळाली. आपल्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर कार्यालयाच्या मदतीने त्यांनी कर्जासाठी बँकेत फाईल टाकली आणि त्यांना ३,९०,००० रुपयांचे कर्ज मंजूर झाले.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून ते मशीन खरेदी करू शकले ही त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. या निमित्त त्यांच्या शेतात भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
अनेक नागरिक #PMEGP योजनेचे लाभ घेत आहेत. ‘आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर धाराशिव’ अंतर्गत जिल्ह्यातील इतर नागरिकांनी सुद्धा सदरील योजनेचा लाभ घ्यावा.
#पंतप्रधान #योजना #मदत #धाराशिव #PMEGP #help #dharashiv