
‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ या तत्त्वानुसार घेण्यात आलेल्या तेरणा ट्रस्टच्या मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : २००० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला !
‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ या तत्त्वानुसार घेण्यात आलेल्या तेरणा ट्रस्टच्या मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : २००० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला !
खामसवाडी, पाडोळी (आ), आरळी (बु) येथे तेरणा ट्रस्टच्या मोफत आरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
आदरणीय डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सदरील शिबिरे घेण्यात आली.
सदरील आरोग्य शिबिरामध्ये खामसवाडी, ता.कळंब, पाडोळी (आ) ता.धाराशिव तसेच आरळी (बु) ता.तुळजापूर व परिसरातील सर्व वयोगटातील तब्बल २००० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला.
यात प्रामुख्याने हृदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग तसेच विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी, उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला. गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी तेरणा हॉस्पिटल नेरुळ, नवी मुंबई येथे दाखल करण्यात येणार आहे.
यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ शैलेश पाटील, डॉ.चंद्रेश पटेल, डॉ.यश पटेल, डॉ.आदिल शेख, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले.
याप्रसंगी संबंधित गाव व परिसरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
#तेरणा #आरोग्य #शिबिर #धाराशिव #terna #health #camp #dharashiv