
मंडप डेकोरेशनचा व्यवसाय वाढविण्यासाठी बुकनवाडी येथील श्री.सतीश शिवाजी परागे यांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) ची मदत !
मंडप डेकोरेशनचा व्यवसाय वाढविण्यासाठी बुकनवाडी येथील श्री.सतीश शिवाजी परागे यांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) ची मदत !
आपल्या मंडप, डेकोरेशन व्यवसायाच्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा पुरवता यावी व व्यवसायही वाढावा अशी त्यांची इच्छा होती. यासाठी व्यवसायात काही नवीन साहित्य समाविष्ट करणे गरजेचे होते. मात्र भांडवल उभे करण्यास त्यांना अनेक अडचणी येत होत्या.
या दरम्यान #PMEGP योजनेची त्यांना माहिती मिळाली. आपल्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर कार्यालयाच्या मदतीने त्यांनी कर्जासाठी बँकेत फाईल टाकली आणि त्यांना ४,५०,००० रुपयांचे कर्ज मंजूर झाले.
यातून ते नवीन उपकरणे, डॉल्बी साऊंड व इतर साहित्य खरेदी करणार आहेत. आगामी काळात गणेश उत्सव, नवरात्री सारखे मोठे सण असल्याचा फायदा होऊन चांगले उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.
आत्मनिर्भर होण्यासाठी #PMEGP योजनेच्या माध्यमातून अनेकांनी आपला व्यवसाय वाढवला आहे. ‘आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर धाराशिव’ या अंतर्गत जिल्ह्यातील इतर नागरिकांनी सुद्धा सदरील योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हावे.