
तेर येथील विठ्ठल बिरूदेव मंदिराच्या सभागृहाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
तेर येथील विठ्ठल बिरूदेव मंदिराच्या सभागृहाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.. मागील ३ पिढ्यांपासून जागेच्या उपलब्धतेमुळे प्रलंबित असलेल्या सदरील मंदिराच्या बांधकामासाठी डॉ.हरीभाऊ कुलकर्णी यांनी आपली २ गुंठे जमीन दिल्याबद्दल, त्यांचा सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने मल्हारराव होळकर चौकातून बिरूदेव मंदिरापर्यंत पारंपारिक वाद्यांच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. आपल्या सांस्कृतिक समृद्धतेचे आणि परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या मिरवणुकीत ग्रामस्थांचा उस्फुर्त सहभाग लाभला.
मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस हे सर्व समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. आगामी काळात देखील धनगर समाजाला न्याय मिळून देण्यासाठी तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.