
तुळजापूर बायपासवरून नळदुर्ग रोडला जोडणाऱ्या सर्व्हिस रोडच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तुळजापूर बायपासवरून नळदुर्ग रोडला जोडणाऱ्या सर्व्हिस रोडच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या कामामुळे आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तसेच तडवळा गावात जाताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत होती.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर तात्काळ संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे काम मार्गी लावण्यासाठी सूचना दिली होती. तुळजापूर शहरातील प्रमुख पदाधिकारी देखील यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते.
या सर्व्हिस रोडमुळे तुळजापूर शहरात येणारी जड वाहने बायपास मार्गे जाणार असल्याने शहरातील वर्दळ थांबून अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.