skip to Main Content
नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत महसूल मंत्री सकारात्मक !

नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत महसूल मंत्री सकारात्मक !

नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत महसूल मंत्री सकारात्मक !
तुळजापूर तालुक्याचे मोठे भौगोलिक क्षेत्र व गावांची संख्या विचारात घेऊन नळदुर्ग येथे अतिरिक्त तहसील मंजूर करण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळासह महसूल मंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.
नळदुर्ग शहराला वैभवशाली इतिहास असून प्राचीन काळी या शहराला अनन्यसाधारण महत्त्व होते. निजाम काळात विभागीय कार्यालय, जिल्ह्याचे केंद्र असा या शहराचा इतिहास आहे. तुळजापूर तालुक्यात १२३ गावे व २ शहरे असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १,४६,००९.९२ हेक्टर आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या २,२६,५२७ इतकी आहे.
या परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र नळदुर्ग तालुक्याची अनेक दिवसांची मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगाने तात्पुरत्या स्वरुपात अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.
मागील अडीच वर्षांपासून याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही महाविकास आघाडी सरकारने हा प्रस्ताव रेंगाळत ठेवला होता. मात्र आता महसूल मंत्री महोदयांनी याबाबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.नेताजी पाटील, ॲड.दीपक आलूरे, उपाध्यक्ष श्री.विक्रम देशमुख, तालुकाध्यक्ष श्री.संतोष बोबडे यांची उपस्थिती होती.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.