
धाराशिव तालुक्यातील पाडोळी येथील विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले.
धाराशिव तालुक्यातील पाडोळी येथील विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले.
गावाच्या विकासासंदर्भात होत असलेल्या मागण्या विचारात घेऊन त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याने आज पाडोळी गाव आधुनिकतेकडे जात असल्याचा आनंद आहे. सदरील कामांमुळे गावकऱ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊन उपयुक्त सुविधा उपलब्ध होणार आहे.
पाडोळी येथे होत असलेले विविध विकासकामे खालीलप्रमाणे :
१.पाडोळी गावांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन.
२. एम.आर.इ.सी.वाय. विहिरीपासून दवाखाना प्रांगणातील टाकीपर्यंत नवीन पाईपलाईन व पाणीपुरवठा विद्युत पंप सेट बसवणे.
३. संभाजीनगर मध्ये आर.ओ. प्लांट बसविणे.
४. पाणीपुरवठा विहिरीची खोली वाढविणे बांधकाम उंची.
५. एम.एन.पी. पाणीपुरवठा विहिरीची उंची वाढवणे रस्ता करणे.
६.पाडोळी सार्वजनिक शौचालय बांधकाम संभाजीनगर (दवाखाना समोर )काम पूर्ण.
७.नरसिंह मंदिर ते श्री.उत्तम बेकेडे घर पेवर ब्लॉक.
८. पाडोळी (आ.) वेस (कमान) दुरुस्ती बांधकाम.
९. श्री.शहाजी गुंड घर ते श्री.शिवाजी गुंड घर आर.सी.सी. रस्ता करणे.
१०. श्री.सुरेश कांबळे घर ते श्री.बबरु कांबळे घरापर्यंत इतर रस्ते पेवर ब्लॉक बसविणे. रस्ता.
११. श्री.हरी पूजारी घर ते श्री.सोजर बोचरे घर (अंबूरे बोळ) व श्री.किसन चव्हाण घर ते श्री.चव्हाण बोळ पेवर ब्लॉक बसविणे.
१२. श्री.युवराज शाहुराज गुंड (नदिशेत) ते श्री.अमोल आप्पाराव कदम शेत (बोरखेडा रस्ता) मजबुती करणे.
१३. श्री.रावसाहेब वसंत गुंड शेत ते श्री.लक्ष्मण किसन गुंड शेत गाडी पाणंद रस्ता मजबुती काम करणे.
यातील बरीच कामे पूर्ण झाली आहेत ज्यांचे लोकार्पण केले तसेच होणाऱ्या कामाचे भमिपूजन करून ‘हर घर तिरंगा’ या संकल्पनेला गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन यावेळी केले.
ग्रामपंचायत कार्यालयाने उर्वरीत कामांसाठी मागण्यांचे निवेदन दिले. येत्या काळात निधी उपलब्ध करून ही देखील कामे पूर्ण करण्यात येतील असे गावकऱ्यांना आश्वासित केले. तसेच केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी पाडोळी व पंचक्रोशीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.