
उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन
उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.. निवडणूक संदर्भातील भाजपाच्या सर्वात सामर्थ्यशाली समितीमध्ये झालेली निवड “सार्थ” आहे.
२०१४ आणि २०१९ साली महाराष्ट्र विधानसभेतील विजयात प्रमुख भूमिका, तसेच बिहार आणि गोवा विधानसभेत प्रभारी म्हणून चाणक्य ठरलेले ना.देवेंद्रजी, राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण समितीमध्ये निर्णायक कार्य करतील हे निश्चित..
भाजपा मध्ये संसदीय मंडळानंतर सर्वात शक्तिशाली मानली जाणारी समिती म्हणजे निवडणूक समिती. लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या तिकिटांचा निर्णय निवडणूक समितीचे सदस्य घेतात. निवडणूक कामकाजाचे सर्व अधिकार पक्षाच्या निवडणूक समितीकडे असतात.
अभ्यासू, मुत्सद्दी, राजकारणाचे उत्तम विश्लेषक, जमिनीवर काम करण्याचा दांडगा अनुभव, नेतृत्व म्हणून प्रदीर्घ यशस्वी काळ, एकनिष्ठ, पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणारे व्यक्तिमत्त्व आदी विविध पैलूंचा विचार केल्यास त्यांची नियुक्ती २०२४ च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
या नव्या भूमिकेतही अभूतपूर्व यश प्राप्त होवो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना..