skip to Main Content
धाराशिव येथे ५०० पेक्षा अधिक दिव्यांग बंधू भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी..

धाराशिव येथे ५०० पेक्षा अधिक दिव्यांग बंधू भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी..

धाराशिव येथे ५०० पेक्षा अधिक दिव्यांग बंधू भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी..
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयामार्फत, वयोमानानुसार दिव्यांगत्व आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना विविध सहाय्यक उपकरणे देऊन सहकार्य करण्यासाठी, धाराशिव जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमास मोठा प्रतिसाद लाभत आहे.
दिनांक १३ ऑगस्ट रोजी धाराशिव येथे शासकीय रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ५०० हून अधिक नागरिकांची तपासणी करून पात्र लाभार्थी निवडण्यात आले.
या योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या राज्यातील ठराविक जिल्ह्यांत धाराशिवचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी दिनांक ११ ऑगस्ट पासून २१ ऑगस्ट पर्यंत जिल्हाभर तालुकानिहाय तपासणी शिबिरे आयोजित केली आहेत. दोन्ही योजनेतील मिळून किमान १०,००० गरजूंना याद्वारे उपकरणे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना चालण्यासाठी काठी, व्हीलचेअर, ट्रायपॉड, एलबो क्रचेस, मोटाराईज्ड ट्रायसिकल, सिपी चेअर, ब्रेल किट, टॅबलेट, रोलाटर, स्मार्ट फोन, ब्रेल केन, अडल्ट किट, अडल्ट फोन, एम.आर.किट आदी उपकरणे दिली जातात.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष श्री.दत्ता कुलकर्णी, श्री.नेताजी पाटील, श्री.सुधाकर गुंड, श्री.अभय इंगळे, श्री.युवराज नळे, श्री.रेवनसिध्द लामतुरे, श्री.नवनाथ नाईकवाडी, श्री.अमोल पेठे, श्री.रवी चौगुले, श्री.संग्राम बनसोडे, श्री.श्याम तेरकर, श्री.माऊली राजगुरु, श्री.प्रकाश तावडे, श्री.राहुल शिंदे, श्री.हिंमत भोसले, श्री.ओम नाईकवाडी, श्री.मेसा जानराव, विद्याताई माने, श्री.सागर दंडनाईक व सामाजिक कार्यकर्ते गरजूंना शिबिरापर्यंत पोहोचविण्यासाठी मदत करत आहेत.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहुल गुप्ता, अलिम्कोचे डॉ.नीरज मौर्य, डॉ.रोहिणी कारंडे, गटविकास अधिकारी श्री.शेरखाने, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.चौगुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय पाटील, तेरणा जनसेवा केंद्राचे कर्मचारी व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत आहे.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.