
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारावर तिरंगा झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारावर तिरंगा झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले..
आपल्या घराप्रमाणे आपल्या प्रत्येक धार्मिक स्थळांवर देखील राष्ट्रध्वज दिमाखात फडकत आहे. आपल्या धार्मिक जाणिवा देखील स्वातंत्र्य आणि मानवतेसह जोडलेल्या आहेत याचेच ते प्रतिक !!
परकीय सत्तेच्या आक्रमणापासून सोडवून रयतेला नवे स्वराज्य निर्माण करण्याची शक्ती क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानीनेच दिली..
इंग्रजी सत्तेला उलथवून लावत स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी क्रांतिवीरांच्या नसांमध्ये, धमन्यांमध्ये निर्माण झालेले सामर्थ्य हे देखील आई तुळजाभवानीचा आशीर्वादच म्हटल्यास वावगे ठरू नये..
आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारावर तिरंगा झेंड्याचे ध्वजारोहण करण्याने आपल्याला आपल्या धार्मिक श्रद्धा आणि स्वातंत्र्य यांच्या उदात्त हेतूचे स्मरण होते.