
स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव सोहळा’ साजरा करण्याच्या अनुषंगाने धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.
स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव सोहळा’ साजरा करण्याच्या अनुषंगाने धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य-दिव्य शोभायात्रा काढली जाणार असून यामध्ये शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, मराठमोळ्या वेशभूषेत महिला, युवक, व्यापारी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतील.
मर्दानी खेळ, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे संचलन, विविध जाती-धर्माचे देखावे, बाईक रॅली, महिला-मुलींचे लेझीम व ढोल-ताशांचे पथक, तलवार-दांडपट्टाचे प्रात्यक्षिक यानिमित्ताने सादर केले जाणार आहेत.
भारत मातेचा रथ, श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या वतीने सुमारे १ किलोमीटर लांबीचा तिरंगा हे या शोभा यात्रेतील मोठे आकर्षण राहणार आहे. शोभा यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक शाळा, महाविद्यालयाला वेगवेगळी संकल्पना देण्यात आली आहे. नाट्य परिषदेने देखील यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात नाटकाचे ३ प्रयोग आयोजित केले आहेत.
शहरातील विविध सामाजिक संघटना, गणेश मंडळासह इतर सर्व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शोभा यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, ही नम्र विनंती..