
पावसामुळे तेर-रामवाडी रस्त्यावर पाणी साचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला. सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता यांच्याशी चर्चा केली.
पावसामुळे तेर-रामवाडी रस्त्यावर पाणी साचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला. सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता यांच्याशी चर्चा केली. तसेच आवश्यक ती उपाययोजना करून सदर रस्ता तात्काळ सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत.
त्याचप्रमाणे तेर-डकवाडी रस्त्यावरील पुल वाहून गेल्याने तेथील वाहतूक बंद झाली आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.मंडगे यांच्या समवेत चर्चा करून त्यांना रस्त्याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनीही तात्काळ पाहणी करून पुढील कार्यास सुरुवात केली. सदर काम लवकरच पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होईल.