पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी देशाला ‘मन की बात’ च्या माध्यमातून संबोधित केले. उपळे (मा) येथील बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, पदाधिकारी व गावकऱ्यांसोबत हा कार्यक्रम पाहिला..
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी देशाला ‘मन की बात’ च्या माध्यमातून संबोधित केले. उपळे (मा) येथील बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, पदाधिकारी व गावकऱ्यांसोबत हा कार्यक्रम पाहिला..
संपूर्ण देश ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करत आहे. देशभरात विविध कार्यक्रम राबवून क्रांतिकारकांना अभिवादन देण्यात येत आहे, यातून राष्ट्रीय एकात्मता सदृढ होण्यास मदत होईल.
येणाऱ्या १३ ते १५ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या घरी तिरंगा फडकवावा तसेच २ ते १५ ऑगस्ट दरम्यान सोशल मीडिया वर तिरंगा प्रोफाईल फोटो म्हणून ठेवावा असे आवाहन यावेळी पंतप्रधान महोदयांनी केले आहे.
स्वातंत्र्य चळवळीतील रेल्वेचे योगदान, व्यवसाय, यात्रा, आयुर्वेद यासोबतच भारतीय खेळणींचा सुद्धा उल्लेख पंतप्रधान महोदयांनी यावेळी केला.
भारतीय खेळाडूंनी यावर्षी अप्रतिम कामगिरी केली आहे. त्या सर्वांना व देशाची मान उंचावण्यासाठी धडपड करत असलेल्या सर्व खेळाडूंना तसेच दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.