
पनवेल येथे भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक
पनवेल येथे भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री.चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. याप्रसंगी महाराष्ट्र भाजपा प्रभारी मा.श्री.सी.टी.रवीजी यांची उपस्थिती होती.
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पक्षाची ही पहिलीच बैठक असून जवळपास ८०० हुन अधिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची या बैठकीत उपस्थिती आहे. पक्ष संघटन, पक्षाची धोरणे व येणाऱ्या काळात जनसेवेची कोणती कामे हाती घ्यायची आहेत याबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत झाली.
पक्षाच्या शेती विषयक प्रस्तावाला याप्रसंगी अनुमोदन दिले. राज्यातील अतिवृष्टी व शेतकरी बांधवांच्या इतर समस्यांतून मार्ग काढण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांची स्थानिक स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त केले.