
दिव्यांग बांधवांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
दिव्यांग बांधवांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
विविध माध्यमातून नागरिकांना ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण कायम पुढाकार घेत असतो. आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या “आत्मनिर्भर भारत” या उपक्रमास धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. आजवर असंख्य नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे.
याचाच एक पुढचा भाग म्हणून दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण शासन मंत्रालय, भारत; कौशल्य विकास कार्यक्रम स्वयंरोजगार सी.एस.आर उपक्रमांतर्गत, दिव्यांग भारतीय रेल्वे वित्त कार्पोरेशन, प्रशिक्षण भागीदार-विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क, पुणे यांच्या वतीने आज सुमारे ५० दिव्यांग बांधवांना डेटा एन्ट्री ऑपरेटिंग कोर्स आणि टेलरिंग कोर्स प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला.
सूक्ष्म कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, भवानी चौक, सांजारोड, धाराशिव येथे सुरू झालेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेचा उपयोग सर्व दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी होईल, याचे विशेष समाधान वाटते.