
‘हिंगोली लोकसभा प्रवास योजना’ संदर्भाने शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे भाजपा कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली.
‘हिंगोली लोकसभा प्रवास योजना’ संदर्भाने शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे भाजपा कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली.
हिंगोली जिल्ह्यात लवकरच केंद्रीय राज्यमंत्री श्री.शंतनूजी ठाकूर यांचा ३ दिवसीय दौरा होणार आहे. यामध्ये पक्ष संघटनात्मक कार्यक्रम, पदाधिकारी बैठक, शासकीय अधिकारी यांच्या आढावा बैठका, धार्मिक व सांस्कृतिक स्थळांना भेटी, लाभार्थी सोबत चर्चा, जनतेशी संवाद, शेतकरी, वंचित व इतर सर्व मागास घटकांसाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी जिल्हा संघटन मंत्री श्री. संजयजी कोडगे, आमदार श्री. तानाजीराव मुटकुळे, आमदार श्री. नामदेवराव ससाणे, हिंगोली जिल्हाध्यक्ष श्री. रामरावजी वडकुते, यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री. नितीनजी भुतडा, माजी खासदार ॲड.श्री.शिवाजीराव माने, माजी आमदार श्री. गजाननराव घुगे, माजी आमदार श्री. राजेंद्र नजरधने, नगर अध्यक्ष श्री. बाबारावजी बांगर, श्री. दुर्गादास साकळे, सौ. दिपाली पाटील, श्री. शिवदास बोड्डेवार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. उज्ज्वलाताई तांभाळे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ.संध्याताई राठोड, दिव्यांग प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष श्री.रामदास पाटील, किसान मोर्चा सरचिटणीस श्री. सुरजितसिंग ठाकूर, श्री. श्याम भारती महाराज, श्री.श्रीकांत देशपांडे, ॲड.श्री.शिवाजी जाधव, श्री. बाळासाहेब नाईक, श्री. डी. के. शिंदे, शंकर बोरुडे, पांडुरंग पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.फुलाजी शिंदे, युवा जिल्हाध्यक्ष श्री.पप्पू चव्हाण, श्री. नाथराव कदम व पदाधिकारी उपस्थित होते.