
हिंगोली लोकसभा मतदारसंघ प्रभारी पदाच्या भारतीय जनता पक्षाने दिलेल्या जबाबदारीची आज सुरुवात झाली, हे मी माझे भाग्य समजतो.
हिंगोली लोकसभा मतदारसंघ प्रभारी पदाच्या भारतीय जनता पक्षाने दिलेल्या जबाबदारीची आज सुरुवात झाली, हे मी माझे भाग्य समजतो.
श्री पाळेश्वर महाराज हेमाडपंथी मंदिर देवस्थानाच्या भक्त निवासातील सभागृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा हिंगोलीचे आमदार श्री.तानाजीराव मुटकुळे यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला..
२ कोटी रुपये खर्च असणारा सदर सभामंडप व भक्त निवासाचे काम व्हावे ही सभोवतालच्या १०-१५ गावातील नागरिकांची मागणी होती.
माजी खासदार श्री.शिवाजीराव माने यांनी धाराशिव जिल्ह्यात सिंचनाची सोय व्हावी यासाठी डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेबांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामाचा आवर्जून उल्लेख केला, ही बाब अभिमानास्पद आहे.
याप्रसंगी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष श्री.रामराव वडकुते, माजी खासदार श्री.शिवाजीराव माने, नगराध्यक्ष श्री.बाबाजीराव बांगर, हिंगोलीचे श्री.पप्पु चव्हाण, श्री.सोनी, श्री.संतोष टेकाळे, जिल्हा परिषद सदस्य श्री.संजुभाऊ बावरगे, जिल्हा परिषद सदस्य श्री.राजू पाटील, श्री.शंकर पाटील, डॉ.रवी पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.फुलाजीराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य ॲड.अमोल जाधव तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.