
पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त : शिंदे-फडणवीस सरकार, सर्वसामान्यांचे सरकार !
पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त : शिंदे-फडणवीस सरकार, सर्वसामान्यांचे सरकार !
महागाई वाढत असताना सर्वसामान्यांना अधिक झळ बसू नये यासाठी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनात केंद्र सरकारने कित्येक दिवस अगोदर पेट्रोल डिझेल वरील कर कमी केले होते. भाजपा शासीत इतर राज्यांमध्ये राज्य सरकारचे दर देखील कमी करण्यात आले होते, मात्र गेल्या दोन-अडीच वर्षांत ठाकरे सरकारच्या काळात इंधनावरील कर प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईची मोठी झळ बसत होती.
केंद्र सरकारने वार्षिक १ लाख कोटींचे नुकसान सहन करून पेट्रोल ९.५ रुपये आणि डिझेल ७ रुपयांनी कमी केले होते. राज्यांनी देखील वर कमी करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते त्या अनुषंगाने भाजपाचे सरकार असलेल्या इतर काही राज्यांनी सुद्धा व्हॅट कमी केला होता.
राज्य सरकारचा कर कमी झाल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात हे आपण वेळोवेळी सांगितले. भाजपातर्फे अनेकदा पाठपुरावा केला, दरवाढी विरोधात अनेक आंदोलने झाली. मात्र, तत्कालीन ढिम्म राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नव्हता.
मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर येताच ६,००० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करून पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त केले आहे. यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. म्हणूनच हे सरकार खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार आहे.