
कृषी अधिकारी श्री.जाधव यांनी ढोकी येथे भेट देऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी कृषी पर्यवेक्षक श्री.भुतेकर, कृषी सहाय्यक श्रीमती जाधव मॅडम, ढोकीतील प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी बांधव सोबत होते.
जिल्हाभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतात गोगलगायींचे प्रमाण वाढले आहे. त्यातून पीके उद्ध्वस्त होत आहेत. यामुळे हैराण झालेल्या शेतकरी बांधवांनी मार्गदर्शन मिळावे अशी विनंती केली होती. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी श्री.जाधव यांना ढोकी येथे जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी श्री.जाधव यांनी ढोकी येथे भेट देऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी कृषी पर्यवेक्षक श्री.भुतेकर, कृषी सहाय्यक श्रीमती जाधव मॅडम, ढोकीतील प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी बांधव सोबत होते.
सोयाबीन, कापूस यासारख्या पिकामध्ये रोप अवस्थेतच गोगलगायींचा प्रादुर्भाव होत असल्याने या गोगलगायींना व त्यांच्या अंड्यांना मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे जेणेकरून त्या नष्ट होतील. सोबतच इतर अनेक पर्याय सुध्दा तालुका कृषी अधिकारी श्री.डी.आर.जाधव यांनी दिले. तसेच नुकसान भरभाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी निवेदन दिले. सदरील मागणी लक्षात घेऊन त्वरित पंचनामे करून लगेच अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की, योग्य सल्ल्याने आपल्या शेतातील पिकांची निगराणी राखावी व गोगलगायी पासून होणारा प्रादुर्भाव टाळावा.