आरणी सोसायटी निवडणुकीत भाजपा प्रणित ‘शेतकरी विकास पॅनल’ने दणदणीत विजय मिळविल्याबद्दल सर्व विजयी उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
आरणी सोसायटी निवडणुकीत भाजपा प्रणित ‘शेतकरी विकास पॅनल’ने दणदणीत विजय मिळविल्याबद्दल सर्व विजयी उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
या निवडणुकीत सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघातून श्री.अच्युत शिंदे, श्री.रमाकांत कोरके, श्री.सिद्धेश्वर कोरके, श्री.बळीराम मुळे, श्री.काकासाहेब शिंदे, श्री.बाळासाहेब घोरपडे, श्री.कालिदास शिंदे, श्री.उमेश शिंदे, महिला राखीव प्रतिनिधींमधून श्रीमती लक्ष्मीबाई नंदकुमार पाटील व श्रीमती अंजली चंद्रकांत पाटील, इतर मागास प्रवर्गातून श्री.संजय शेळके, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून श्री.रामकिसन साबळे, भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून श्री.गणपती मुसळे यांनी विजय मिळविला.
हे पॅनल येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करेल असा विश्वास आहे. या विजयासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचे अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.