
ड्रोनद्वारे पिकांवर औषध फवारणीचा प्रयोग यशस्वी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील श्री.विशाल मगर यांचे हार्दिक अभिनंदन !
ड्रोनद्वारे पिकांवर औषध फवारणीचा प्रयोग यशस्वी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील श्री.विशाल मगर यांचे हार्दिक अभिनंदन !
देशातील ग्रामीण भागामध्ये शेतीच्या विविध अडचणी लक्षात घेऊन ड्रोनचा योग्य पद्धतीने वापर करता येऊ शकतो. याविषयी आपण कृषी विद्यापीठ, टाटा सामाजिक संस्था, कृषी विभागाचे अधिकारी व काही शेतकरी उत्पादक कंपनींच्या प्रतिनिधींसह प्रत्यक्ष बैठका गेल्या काही महिन्यात घेतल्या होत्या.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान फायदेशीर बनवण्यासाठी व ड्रोन वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भरीव अनुदान जाहीर केले आहे. विविध घटकांसाठी ४०% ते १००% अनुदान दिले जाणार आहे.
आपल्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून यासंबंधी अनेक उपाय योजना आपण सुरू केल्या आहेत. तरी युवक मित्रांना आवाहन आहे की आपण श्री.विशाल मगर यांचा आदर्श घेऊन आधुनिक शेतीकडे वळावे. जी काही मदत लागेल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.