
वडगाव जहागीर, ता.कळंब येथील सौ.अश्विनी विजय शेटे यांच्या ब्युटी पार्लरच्या व्यवसायाला पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) योजनेचा मदतीचा हात !
वडगाव जहागीर, ता.कळंब येथील सौ.अश्विनी विजय शेटे यांच्या ब्युटी पार्लरच्या व्यवसायाला पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) योजनेचा मदतीचा हात !
पतीला अर्थार्जन करण्यासाठी हातभार लावण्याच्या आणि स्वावलंबी होऊन घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने सौ.अश्विनी शेटे यांनी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पार्लर चालवण्याची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली. स्वतःचे पार्लर सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र यासाठी त्यांना भांडवल उपलब्ध होत नव्हते.
‘भाजपा आपल्या गावी’ या आपल्या अभियानाची माहिती त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या आपल्या अभियानाविषयी अधिक माहिती मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी मला संपर्क केला. आपल्या कार्यालयामधून त्यांना #PMEGP या योजनेविषयी सविस्तर माहिती मिळाली. त्यांची कर्जाची फाईल तयार करून आपण बँकेमधून १,४४,००० हजार रुपयांचे कर्ज त्यांना मंजूर करून घेण्यास सहकार्य केले. त्यांच्या या व्यवसायास सुरुवात झाली असून महिन्याला रु.२०,००० उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.
अनेक महिला या योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी होत आहेत, आपले अस्तित्व निर्माण करत आहेत ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. जिल्ह्यातील महिला, युवकांनी देखील पुढे येऊन या योजनेचा लाभ घेत व्यवसायामध्ये पाऊल टाकावे व आपली एक ओळख निर्माण करावी. यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत.