
येरमाळा ता.कळंब येथील सौ.ऋतुजा बारकूल यांच्या व्यवसायाला पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) योजनेच्या माध्यमातून नवी उभारी !
येरमाळा ता.कळंब येथील सौ.ऋतुजा बारकूल यांच्या व्यवसायाला पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) योजनेच्या माध्यमातून नवी उभारी !
सौ.ऋतुजा यांचा पती श्री.बारकुल यांच्या समवेत हॉटेल, लॉजिंगचा व्यवसाय सुरू आहे. सदर व्यवसाय अधिक वृद्धिंगत व्हावा अशी त्यांची अनेक वर्षांपासून इच्छा होती. मात्र व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक तेवढे भांडवल त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते.
‘भाजपा आपल्या गावी’ या अभियानाच्या माध्यमातून त्यांना #PMEGP योजनेविषयी माहिती मिळाली. आपल्या टीमच्या मदतीने त्यांनी रीतसर अर्ज करून ८.५ लक्ष रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. नव्या व्यवसायातून महिन्याला १ ते १.२५ लक्ष रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.
‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेतून केवळ नवउद्योजक निर्माण होतात असे नाही तर व्यवसायाच्या वृद्धीसाठी देखील आता अनेकजण पुढे येऊ लागले आहेत, याचे हे एक उत्तम उदाहरण..
अधिकाधिक युवकांनी, गृहिणींनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या संकल्पनेचा, योजनेचा लाभ घ्यावा. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी, आपल्याला आवश्यकता कर्ज प्रक्रियेतील मदतीसाठी आम्ही सदैव आपल्याबरोबर आहोत..