skip to Main Content
#PMEGP योजनेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथे बिकट आर्थिक परिस्थितीमुळे २२ वर्षांपासून बंद पडलेल्या व्यवसायास उभारी !

श्री.दत्ता नागुराव धावारे यांच्या मोठ्या भावाचा २००१ मध्ये विजेचा शॉक लागून मृत्यू झाला..कर्त्या पुरुषाच्या अचानक मृत्यूमुळे संपूर्ण परिवारावर शोककळा पसरली..कर्ता पुरुष गेला, घरात लहान भावंडं, उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न अशी अत्यंत हालाखीची परिस्थिती होती. उपजीविकेचे कोणतेही साधन नव्हते.
कर्ता पुरुष नसल्यामुळे मंगल कार्यालयातील स्पिकरच्या सेवेचा स्वतःचा व्यवसाय बंद पडला होता, मात्र नंतर अपुऱ्या पैशांअभावी तो सुरूही करता आला नाही. अशा परिस्थितीत काय करावे हा प्रश्न श्री.दत्ता यांना भेडसावू लागला.
‘भाजपा आपल्या गावी’ या अभियानाच्या माध्यमातून श्री.दत्ता धावारे यांना #PMEGP योजनेबद्दल माहिती मिळाली. जुन्या बंद पडलेल्या कामास पुन्हा सुरू करण्याची उमेद त्यांना मिळाली. आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांना संपूर्ण सहकार्य मिळाले. त्यांनी बँकेत अर्ज केला आणि त्यांचा अर्ज मंजूरही झाला. लवकरच त्यांना २,०७,००० रुपये रक्कम मिळून व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू होईल.
कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची जिद्द असेल व मिळालेल्या योग्य संधीचे सोने करता येत असेल तर अशक्य वाटणारी गोष्ट ही घडून येते… श्री.दत्ता हे याचेच उत्तम उदाहरण आहेत.
जिल्ह्यातील युवकांनी देखील आपल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यावर भर द्यावा. ‘आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर उस्मानाबाद’ या आपल्या ध्येयपूर्तीसाठी युवकांनी पुढाकार घेऊन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना आर्थिक दृष्ट्या अधिक समृद्ध करावे.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.