
“उमेद”च्या माध्यमातून उस्मानाबादमध्ये आयोजित डाळ व तांदूळ महोत्सवास भेट देऊन बचत गटाच्या महिलांशी संवाद साधला.
“उमेद”च्या माध्यमातून उस्मानाबादमध्ये आयोजित डाळ व तांदूळ महोत्सवास भेट देऊन बचत गटाच्या महिलांशी संवाद साधला. आत्मनिर्भर भारत व इतर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहुल गुप्ता आदी सोबत होते.
या मेळाव्याच्या माध्यमातून बचत गट आणि शेतकरी बांधवांना आपल्या जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण धान्य सर्वांसाठी उपलब्ध करून देता आले. तसेच नागरिकांना देखील विविध प्रकारच्या डाळी व तांदूळ एकाच छताखाली उपलब्ध झाल्या. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून या माध्यमातून बचत गट, फार्मर प्रोड्युसर कंपनी ते ग्राहक थेट व्यवहार झाल्याने दोघांनाही याचा थेट फायदा मिळाला.
या महोत्सवाचा आज शेवटचा दिवस असून याचा लाभ सर्व उस्मानाबाद वासियांनी घ्यावा.
यापुढे हा उपक्रम केवळ काही काळाकरता मर्यादित न राहता, बचत गट उत्पादीत माल व फार्मर प्रोड्युसर कंपनींना बाजारपेठेची कायम उपलब्धता असावी यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करणे सर्वांसाठी लाभदायक ठरणार आहे.