
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे तब्बल रु.३ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे तब्बल रु.३ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. तसेच ‘भाजपा आपल्या गावी’ या अभियाना अंतर्गत बैठक घेऊन गावातील नागरिकांशी संवाद साधला.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या अभियानातून तुळजापूर तालुक्यामध्ये उत्कृष्ट कार्य होत आहे. येथील टीमची जिद्द, चिकाटी वाखाणण्याजोगी आहे.
रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे देशात इंधन व गॅस महाग झाला. मात्र सामान्य जनतेला त्रास जाणवताच केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करत जनतेला दिलासा दिला. याउलट राज्य सरकारने कर कमी न करता जनतेची लूट सुरूच ठेवली.
आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने येथे कार्यक्रम घेत आहोत हे सर्व मोदीजींच्या कार्यामुळे शक्य होऊ शकले. त्यांनी ८० कोटी लोकांना मोफत लस दिली. कोरोना काळात लोकांचा रोजगार गेलेला असताना त्यांना मोफत धान्य उपलब्ध करून दिले.
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्याकडे व्हिजन आहे आणि त्यामुळेच भारत विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे. त्यांनी पंतप्रधानपद भूषाविल्यापासून एकही सुट्टी घेतलेली नाही. गेल्या आठवड्यात त्यांनी विदेशात ३ दिवसांमध्ये २५ कार्यक्रम घेतले. यातूनच मोदीजी कर्मयोगी असल्याचे दिसून येते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेच्या पाटील कुटुंबियांवर असणाऱ्या प्रेमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. डॉ.साहेबांनी पाटबंधारे मंत्री असताना केलेल्या कार्यामुळे आज संपूर्ण जिल्ह्यात पाणी आहे. याचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना ५,००० कोटी रुपयांचा फायदा मिळत आहे.
आधी जिल्ह्यात १ साखर कारखाना होता. त्याला सुद्धा ऊस मिळत नव्हता. नाईलाजाने कर्नाटकातून ऊस मागवावा लागत होता. मात्र डॉ.साहेबांच्या कार्यामुळे जिल्ह्यात हरित क्रांती झाली. आता आपल्याला औद्योगिक क्रांती करायची आहे. आपल्याला सक्षम उस्मानाबाद बनविण्यासाठी परिश्रम घ्यायचे आहेत.