skip to Main Content
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठीची बैठक

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठीची बैठक

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची श्री तुळजाभवानी. महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, तेलंगणा तसेच तामिळनाडू मध्यप्रदेश अशा अनेक ठिकाणाहून आणि देशभरातून अनेक भाविक भक्त जगदंबेच्या दर्शनासाठी तुळजापूर मध्ये येत असतात. श्री तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत, त्यामुळे अशा या तीर्थ क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे आराध्य असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अतिशय भव्यदिव्य स्वरूपात आणि सर्वांना आदर्शवत वाटावा, सर्वांना पहावासा वाटावा अशा पद्धतीने या ठिकाणी उभारावा या दृष्टिकोनातून अनेक दिवसांपासून प्रयत्न चालू होते. याच अनुषंगाने तुळजापूर येथील सर्किट हाऊस मध्ये एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

सुशोभीकरणासाठी सध्या महाराजांचा पुतळा काढून ठेवला आहे, हा पुतळा साधारणतः पन्नास वर्षापूर्वी (१९७० ते ७२ च्या कालावधीमध्ये) तुळजापूर येथे बसविण्यात आलेला होता. परंतु सर्व तुळजापूर वासीय आणि महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी च्या इच्छेचा मान राखत,छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक अतिशय अलौकिक आणि देखणं असं हे शिल्प उभं करण्याचा मानस बोलून दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सुशोभित करण्यासाठी बॉलीवुड चित्रपटांमध्ये अनेक सेट उभे करण्याचा अनुभव असणारे नामांकित असे नितीन देसाई, तज्ञ आर्किटेक्चर शशी प्रभू यांना बोलाऊन त्यांचे मार्गदर्शन देखील आपण घेणार आहोत.

याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय देवानंद भाऊ रोचकरी, तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री.चंद्रकांत कणे, तसेच तुळजापुरचे दशावतार मठाचे मठाधिपती महंत माऊजीनाथ, अरण्य मठाचे महंत अरण्य बुवा, नगर अभियंता चव्हाण, काँग्रेस आय नगरसेवक अमर मगर, नगरसेवक विजय कंदले, भाजपा नेते नागेश नाना नाईक, प्रा.काकासाहेब शिंदे, प्रा.संभाजी भोसले, पत्रकार गोविंद कुरुद, पत्रकार श्रीकांत कदम, छावा संघटनेचे जीवन राजे इंगळे, महेश चोपदार, आर्किटेक्चर सुहास राऊत, अभिजित कदम, गुड्डू कदम, अण्णासाहेब क्षीरसागर, अविनाश गंगणे, आनंद कंदले, भाजपाचे साहेबराव घुगे, जनहित संघटनेचे अजय साळुंखे, कुमार टोले, अर्जुन आप्पा साळुंखे, नगरसेवक पंडितराव जगदाळे, किशोर पवार, दत्ता सोमाजी, चेतन शिंदे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.